मुंबई ते छपरा दरम्यान अतिरिक्त २२ विशेष गाड्या

मुंबई

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीच्या नियंत्रणासाठी रेल्वे प्रशासनाने मुंबई-छपरा दरम्यान अतिरिक्त २२ उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांनी अतिरिक्त रेल्वे गाड्यांची मागणी केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गाड्यांचा निर्णय घेतला.

साप्ताहिक विशेष रेल्वे १९ एप्रिल ते २८ जूनपर्यंत दर शुक्रवारी ९.४० वाजता पनवेल येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.५० वाजता छपरा येथे पोहोचेल. साप्ताहिक विशेष रेल्वे १८ एप्रिल ते २७ जूनपर्यंत दर गुरुवारी ३.२० वाजता छपरा येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ८.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल. या रेल्वे कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, बनारस, वाराणसी, ज्ञानपूर शहर आणि बलिया या स्थानकांवर थांबतील. आजपासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर या गाड्यांचे आरक्षण सुरु झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top