मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात ! ४ जण जखमी

ठाणे

मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका जवळ आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एका ट्रकने टँकरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जण जखमी झाले. ट्रक चालक इजाज अहमद (४०), त्याचा सहकारी राशिद अब्दुल (२६), प्रवासी अमजर खान (३५), अब्दुल समत (२३) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातावेळी ट्रकमध्ये ८ प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मालेगाव येथून ८ प्रवासी आणि १२ टन मैदा घेऊन ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता. हा ट्रक सकाळी खारेगाव टोलनाका जवळ आला असता, इजाज अहमद यांचा ट्रकवरील ताबा सुटल्याने तो एका टँकरला धडकला. या भीषण अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कळवा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रकमध्ये अडकलेल्या जखमींना सुखरुप बाहेर काढले. अपघातामुळे काही काळ मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुक कोंडी झाली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top