मुंबई पश्चिम उपनगरामध्ये टँकरने पाणीपुरवठा

मुंबई- राज्यभरात निवडणूक प्रचाराची धूम सुरू असताना मुंबई पश्चिम उपनगरातील जनता अपुऱ्या पाणीपुरवठ्याने त्रस्त आहे. इथल्या अनेक भागातील नागरिकांवर पाण्याचे टँकर मागविण्याची वेळ आली आहे. पालिकेने अद्याप पाणीकपात जाहीर केली नसतानाही पाणीपुरवठा अपुरा होत आहे.

पश्चिम उपनगरातील वांद्रे, खार, सांताक्रूझ, गोराई, कांदिवली पूर्व, समतानगर, लोखंडवाला,चारकोप आणि दहिसर भागात कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. दहिसर गावठाणमधील अनेक सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्या भरत नसल्याने येथील रहिवाशांना पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत. विशेष म्हणजे सात ते आठ हजार रुपये देऊन पालिकेच्या फिलिंग पॉईंटवरून हे टँकर भरले जात असल्याचे स्थानिक रहिवाशी सांगत आहेत. कांदिवली पश्चिमेकडील समतानगरातही हीच परिस्थिती आहे. सरोवा या सोसायटीत अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. घरामध्ये पाणी साठवण्याची टाकी बसविण्याची परवानगी नसल्याने पाण्याअभावी घरातील कामे खोळंबली जात आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top