मुंबई पालिका अर्थसंकल्प शुक्रवारी सादर होणार

मुंबई
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प शुक्रवारी २ फेब्रुवारीला मांडला जाणार आहे. महापालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असल्याने शिक्षण विभागाचा अर्थसंकल्पीय अंदाज अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिंडे किंवा उपायुक्त (शिक्षण) चंदा जाधव तर मुख्य अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त प्रकल्प पी वेलरासू हे महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांना सादर करणार आहेत.
या अर्थसंकल्पात भांडवली खर्चाचा आकडा 40 टक्क्यांवर जाणार असल्याची चर्चा आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्पात चार हजार कोटींची वाढ होणार आहे. मुंबई महापालिकेच्या 91 हजार कोटींच्या ठेवी 84 हजार कोटींवर आल्या आहेत. दुसरीकडे वर्सोवा दहिसर दहिसर भाईंदर उन्नत मार्ग, समुद्राचे पाणी गोडे करणे असे मोठे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असला तरी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर 2024-25चा अर्थसंकल्प फुगीर असेल त्यामुळे करदात्या मुंबईकरांच्या पदरी नेमके काय पडणार हे अर्थसंकल्पाच्या दिवशी समोर येईल. मात्र मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे यंदाही निवडणूक जवळ आल्याने कोणतीही करवाढ होण्याची शक्यता नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top