मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज 6 तासांचा ब्लॉक

    पुणे 
 पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग रेल्वे कॉरिडोरचे काम करण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उद्या गुरुवारी 6 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकदरम्यान मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक बंद असणार आहे. या ब्लॉक कालावधीत एक्स्प्रेस वेवर हलक्या आणि अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.  
 एक्स्प्रेस वेवरून पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी हलकी वाहने मुंबई लेन किमी 55 वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्त होतील. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बस आणि इतर हलकी वाहने मुंबई लेन किमी. 39.800 खोपोली एक्झिटवरून वळवून मुंबई पुणे  महामार्गावरून मार्गस्त करता येतील. खालापूर टोलनाका शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट किमी 32.500 येथून वळवून मुंबई-पुणे महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाका मार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्त करता येतील. पुण्याहून मुंबईकडे येणारी सर्व वाहने पनवेल एक्झिटवरून वळवून मुंबई पुणे महामार्गावरून करंजाडे मार्गे कळंबोली अशी मार्गस्थ करता येतील. मुंबई-पुणे   महामार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी सर्व प्रकारची वाहने शेडुंग फाट्यावरून पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top