मुंबई बीडीडी चाळीत २०११ नंतरच्या पोलिसांना घर नाही

मुंबई :

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. या चाळींचा पुनर्विकास होत असताना १ जानेवारी २०११ पर्यंतच्या पोलीस कर्मचाऱ्यांना पात्र करत त्यांना पुनर्विकास प्रकल्पात सहभागी केल जाणार आहे. मात्र दादर नायगाव आणि वरळी या परिसरामधील बीडीडी चाळींमध्ये २ जानेवारी २०११ नंतरच्या पोलीस कुटुंबीयांना घर मिळणार नाहीत. त्यामुळे असे २०० पोलीस कुटुंबीय सध्या आम्हाला घर मिळेल का घर अशी साद सरकारकडे घालत आहेत. सरकार दरबारी गेल्या वर्षभरापासून हा प्रश्न ते मांडत आहेत. मात्र तरीही हा त्यांचा प्रश्न सोडवला जात नाही, त्यामुळे पोलीस कुटुंबीय संतप्त आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top