मुंबई महापालिका आता नारळांची विक्री करणार !

मुंबई – मुंबई महापालिकेने आता आपल्या मालकीच्या असणाऱ्या नारळाच्या झाडांवरील नारळाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने निविदा मागवल्या आहेत.पालिकेच्या सहा परिमंडळातील नारळ विक्री केली जाणार आहे.यातून महापालिकेला महिन्याला किमान दोन ते तीन लाखांचा महसुल अपेक्षित आहे,अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

मुंबईतील वातावरण हे नारळाच्या झाडांसाठी पोषक आहे. त्यामुळे मुंबईत नारळाच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसते. पालिकेची मैदाने, उद्याने, रस्ते, विविध कार्यालये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नारळाची झाडे दिसतात. या झाडांना मोठ्या प्रमाणात नारळ लागतात. त्यांची विक्री करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी कुशल,तरबेज कामगार पुरविणार्‍या कंत्राटदाराला हे कंत्राट दिले जाणार आहे.शहरात विविध ठिकाणी महापालिकेच्या जागेवर ४० ते ५० हजार नारळ झाडे आहेत.परंतु हे नारळ वेळीच काढले जात नसल्याने नारळ पडून अपघात होण्याची शक्यता आहे.त्यामुळेच पालिकेने योग्यवेळी हे नारळ काढून ते विकण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top