मुंबई-मॉरिशस विमानात ५ तास प्रवासी अडकले

मुंबई

मुंबईहून मॉरिशसला जाणाऱ्या ‘एअर मॉरिशस’च्या विमानात काल सकाळी अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे प्रवशांना तब्बल ५ तास विमानातच थांबावे लागले. यावेळी विमानत तब्बल २०० प्रवासी होते. यामध्ये एका ७८ वर्षीय वृध्द प्रवाशासह अनेक लहान मुलांचा देखील समावेश होता. विमानतील बिघाडामुळे सर्व प्रवासी ५ तास विमानातच बसून होते.

विमानातील वातानुकुलित यंत्रणा देखील व्यवस्थित नसल्यामुळे अनेक प्रवाशांना श्वसनाचा त्रास झाला. जवळपास तासाभराने विमानात तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे उड्डाण होऊ शकत नसल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. विमानात चढल्यानंतर काही वेळातच इंजिनमध्ये बिघाड झाल्या प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला. विमान काल पहाटे ४.३० वाजता उड्डाण करणार होते. त्यासाठी पहाटे ३.४५ वाजता प्रवाशांचा विमानात प्रवेश सुरू झाला. मात्र, त्यानंतर विमानाच्या इंजिनमध्ये समस्या निर्माण झाली. विमानाने उड्डाण न केल्याने प्रवाशांना पाच तास विमानातच बसावे लागले, त्यांना खाली उतरण्याची परवानगी नव्हती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top