Home / News / मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक २२ सप्टेंबरला

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक २२ सप्टेंबरला

मुंबई – दोन वर्षांपासून रखडलेली मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक २२ सप्टेंबरला होणार असून मतमोजणी २५...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – दोन वर्षांपासून रखडलेली मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक २२ सप्टेंबरला होणार असून मतमोजणी २५ सप्टेंबरला पार पडणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या १० सिनेट सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यापैकी ५ जागा या खुल्या प्रवर्गासाठी, तर उर्वरित ५ जागा या एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहेत. याआधी २१ एप्रिल रोजी ही निवडणूक होणार होती. मात्र मतदार नोंदणीच्या यादीवर आक्षेप घेतल्यानंतर हे सर्व प्रकरण न्यायालयात गेले, त्यानंतर ही निवडणूक रखडली होती. आता मुंबई विद्यापीठाने सविस्तर वेळापत्रक परिपत्रक काढून जाहीर केले आहे. ६ ऑगस्टपासून या निवडणुकीचे अर्ज दाखल करता येतील. २२ सप्टेंबरला सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत मतदान पार पडेल, तर २५ सप्टेंबरला मतमोजणीस सुरूवात होईल. मात्र, त्याआधी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या किंवा आचारसंहिता लागल्यास या निवडणुका पुन्हा रखडण्याची शक्यता आहे.

Web Title:
संबंधित बातम्या