मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या तारखा जाहीर

२१ एप्रिलला मतदान होणार

मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर (सिनेट) निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २१ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून २४ एप्रिल २०२३ रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी नव्याने मतदार नोंदणी आजपासून सुरू झाली आहे, मात्र याआधी मतदार नोंदणी शुल्क भरलेल्यांना पुन्हा शुल्क भरण्याची गरज नसेल.

मतदारांना आपले नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी जुन्याच लॉगिन आयडीद्वारे नव्याने नोंदणी करता येणार आहे, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. ३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत नव्याने मतदार नोंदणी करण्यात येईल. १ डिसेंबर ते २५ फेब्रुवारी या कालावधीत अर्ज छाननी, आक्षेप व मतदार यादी प्रसिद्धी करण्यात येईल. २९ फेब्रुवारी रोजी निवडणूक अधिसूचना जाहीर करण्यात येणार आहे. ११ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारला जाईल. १८ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येईल. २० मार्च रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल. २१ एप्रिल रोजी निवडणूक पार पडेल, तर २४ एप्रिल रोजी मतमोजणी करण्यात येईल, असे विद्यापीठाने सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top