Home / News / मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्वरित मिळणार वैद्यकीय मदत, निकष ठरवण्यासाठी सरकारने स्थापन केली समिती

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्वरित मिळणार वैद्यकीय मदत, निकष ठरवण्यासाठी सरकारने स्थापन केली समिती

CM Relief Fund : आता राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय मदत मिळवणे अधिक सोपे होणार आहे. सरकारकडून यांतर्गत येणारे आजार,...

By: Team Navakal

CM Relief Fund : आता राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय मदत मिळवणे अधिक सोपे होणार आहे. सरकारकडून यांतर्गत येणारे आजार, अर्थसहाय्याची रक्कम व रुग्णालय संलग्नीकरण हे निकष निश्चित करण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले आहे.

सरकारकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधींतर्गत वैद्यकीय मदतीचे निकष ठरवण्यासाठी ही समिती स्थापन्यात आली असून, या समितीमध्ये संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय हे अध्यक्ष असतील. तसेच, मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कक्ष अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. या समितीद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत वैद्यकीय मदत उपलब्ध करण्यासाठी वेगवेगळ्या शिफारसी सादर केल्या जाणार आहेत.

या समितीमध्ये, आरोग्य संचालनालय (मुंबई) चे संचालक, आयुष संचालनालय (मुंबई) चे संचालक,  सर ज.जी रुग्णालय समूहाचे अधिष्ठाता, लोकमान्य टिळक स्मारक रुग्णालय (सायन) चे अधिष्ठाता, मुख्यमंत्री यांचे सल्लागार डॉ. आनंद बंग,  वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (मुंबई) चे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे,  वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (मुंबई) यांचे माजी संचालक डॉ. तात्याराव लहाने,  एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. रमाकांत देशपांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान ( छत्रपती संभाजीनगर) चे सचिव डॉ. अश्विनीकुमार तुपकरी,  के.ई.एम रुग्णालय (मुंबई) चे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे,  टाटा मेमोरियल सेंटर (परळ, मुंबई ) चे  संचालक अकॅडमी डॉ. श्रीपाद बनावली, कौशल्य धर्मादाय रुग्णालय (ठाणे) चे संचालक डॉ. संजय ओक,  बॉम्बे हॉस्पिटल ( मुंबई), नेफरोलॉजी विभागचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. बिच्छू श्रीरंग, पी.डी. हिंदुजा रुग्णालय (मुंबई) चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. जॉय चक्रवर्ती,  नायर हॉस्पिटल ( मुंबई) मधील ऋदयविकार विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. अजय चौरसिया,  बॉम्बे हॉस्पिटल (मुंबई) च्या कन्सल्टंट फिजिशियन अँड इंटेसिविस्ट डॉ. गौतम भन्साळी, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (नागपूर) चे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक,  दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (पुणे) यांच्या हॉस्पिटल मॅनेजमेंट कमिटीचे सचिव डॉ. माधव भट हे सदस्य म्हणून कार्यरत असतील.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या