मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी अमेरिकेत चालविली सायकल

चेन्नई – तामिळनाडूचे ७१ वर्षांचे मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांनी अमेरिकेच्या शिकागो शहरात स्वतः सायकल चालवितानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ काही क्षणात व्हायरल झाला.या व्हिडिओवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रतिक्रिया देताना म्हणाले ब्रदर , कधीतरी चेन्नईत दोघे सायकल चालवूया .स्टॅलीन यांचा द्रमुक पक्ष काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहे. काँग्रेस आणि द्रमुक यांच्यामधील नव्या मैत्रीची झलक राहुल गांधी यांच्या प्रतिक्रियेवरून दिसली.