मुरुडमध्ये आज दिवसभर वीजपुरवठा होणार खंडित

मुरुड – पावसाळ्यापूर्वी विजेसंदर्भातील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी उद्या ३० एप्रिल रोजी मुरुडमध्ये दिवसभर वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. यादिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुरुड महावितरणने लोडशेडिंग करण्याचा निर्णय घेतला आहे .

यासंदर्भात मुरुड महावितरणचे उप कार्यकारी अभियंता कृष्णात सुर्यवंशी यांनी सांगितले की, पावसाळ्यापूर्वी मेंटेनन्सची सर्व कामे, त्याचप्रमाणे मुख्य वाहिनीवर येणाऱ्या झाडांची छाटणी तसेच झंपरची कामे पूर्ण करण्यासाठी मुरुड महावितरणने हे भारनियमन जाहीर केले आहे. यापुढे आणखी एकदा असेच भारनियमन केले जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top