मुळगावात पुन्हा बिबट्याचा संचार

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील डिचोली मुळगाव परिसरात दीड महिन्यापूर्वी धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनखात्याने जेरबंद केले होते.मात्र,आता आणखी एका बिबट्याचा मुळगावात संचार सुरू झाल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे.रात्रीच्यावेळी हा बिबट्या लोकवस्तीतील रस्त्यांवर फिरताना काहीजणांच्या निदर्शनास आला आहे.

या बिबट्याला पकडण्यासाठी वन खाते सज्ज झाले असून मुळगावात सापळाही लावला आहे.ऑगस्ट महिन्यात एका बिबट्याने मुळगावात लोकवस्तीजवळ दहशत माजवली होती. अखेर १४ऑगस्टच्या मध्यरात्री हा बिबट्या वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्याला पकडल्यानंतर मुळगावातील जनतेने सुटकेचा श्वास घेतला होता. त्यानंतर आता आणखी एका बिबट्याचा संचार सुरू झाल्याने लोक पुन्हा भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. श्री तळेश्वर घुमटीकडून गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर सोमवारी रात्री काही युवकांना या बिबट्याचे दर्शन घडले. मुळगाव गावकर ते मानसबाग पर्यंत कुत्रे गायब होण्याचे प्रकारही वाढले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top