Home / News / मुसळधार पावसासह जमैकाला बेरिल चक्रीवादळ थडकले

मुसळधार पावसासह जमैकाला बेरिल चक्रीवादळ थडकले

जमैकाबेरिल चक्रीवादळाने जमैकाला धडक दिली असून या चक्रीवादळाने इथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्याचबरोबर येथील समुद्रात ९ मीटर इतक्या उंच...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

जमैका
बेरिल चक्रीवादळाने जमैकाला धडक दिली असून या चक्रीवादळाने इथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्याचबरोबर येथील समुद्रात ९ मीटर इतक्या उंच लाटाही उसळल्या असून जमैका परिसरात ताशी १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. हे चक्रीवादळ पुढे टेक्सासच्या दिशेने निघालेले आहे.

वेस्ट इंडिजच्या बेटांवर गेल्या काही दिवसांपासून बेरिल चक्रीवादळाची शक्यता होती. त्यामुळे विश्वविजेता भारतीय संघही बार्बाडोसमध्ये अडकला होता. या चक्रीवादळामुळे जमैकाच्या समुद्रकिनाऱ्यावर अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. जमैका प्रशासनाने राज्यात आणीबाणी आणि संचारबंदी घोषित केली होती. हे चक्रीवादळ आज जमैकाला धडकले.

जमैकामधील पूरस्थितीत अडकलेल्या दुर्गम भागातील लोकांसाठी ९०० निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जमैकाचे माहिती व प्रसारण मंत्री डाना मोरीस यांनी दिली. त्यानंतर हे चक्रीवादळ मुख्य केंद्र कॅनमॅन बेटावर धडकणार असून तिथून पुढे ते मेक्सिकोच्या युकाटान द्विपकल्पावर धडकणार असून त्यानंतर या चक्रीवादळाचा वेग मंदावेल असे हवामान खात्याने सांगितले आहे. बेरिल चक्रीवादळात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या चक्रीवादळाने ग्रेनेडात मोठे नुकसान केले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या