मुस्लिमांनी युरोपपासून दूर राहावे ! इटलीच्या पंतप्रधानांचे वादग्रस्त विधान

रोम

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असतात. सध्या जॉर्जिया यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे त्या पुन्हा नव्याने चर्चेत आल्या आहेत. ‘इस्लामिक संस्कृती आणि युरोपिय संस्कृती यांच्यात कोणतेही साम्य नाही. त्यामुळे युरोपात इस्लामला अजिबात जागा नाही. मुस्लिमांनी युरोपापासून दूर राहावे,’ असे विधान जॉर्जिया यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंतप्रधान पंतप्रधान म्हणाल्या की, ‘आमची सभ्यतेचे मूल्य आणि इस्लामी मूल्य यांमध्ये कोणतेही साम्य नाही. या दोन्ही संस्कृती परस्परविरोधी आहेत. इटलीच्या इस्लाम सांस्कृतिक केंद्रांना सौदी अरेबिया निधी पुरवत आहे. युरोपचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आमच्या सभ्यतेच्या मूल्यांपासून वेगळे आहे. त्यामुळेच मुस्लिमांनी यूरोपापासून दूर राहावे’.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या वक्तव्यानंतर जॉर्जिया यांनी हे विधान केले आहे. अलिकडेच ऋषी सुनक इटली दौऱ्यावर आले होते. त्यावेळी अवैध पद्धतीने युरोपमध्ये वाढणाऱ्या निर्वासितांच्या संख्येवर त्यांनी भाष्य केले. अवैध निर्वासितांकडून युरोपमध्ये वाढणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top