मुस्लीम महिला घेऊन येणारअयोध्येतून काशीला रामज्योती

वाराणसी – अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना हा सध्या संपूर्ण देशाच उत्कंठेचा विषय ठरला आहे. या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी काय काय तयारी करण्यात आली आहे याचे अनेक व्हिडिओ आणि बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशीच एक बातमी आहे दीपोत्सवाची. हा दीपोत्सव फक्त अयोध्यानगरीतच नव्हे तर काशीमध्येही साजरा होणार आहे. त्यासाठी मुस्लीम महिला अयोध्येतून रामज्योती काशी येथे घेऊन येणार आहेत.

22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी सर्वांनी राम मंदिरात गर्दी करू नये म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात किंवा नजिकच्या कोणत्याही मंदिरात दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राम मंदिर न्यासाने केले आहे.
हा दीपोत्सव काशीमध्येही साजरा होणार आहे. संपूर्ण काशी दिव्यांच्या लखलखाटाने उजळून निघणार आहे.या रामज्योती अयोध्येहून काशीमध्ये घेऊन येण्याची जबाबदारी रामभक्त डॉ.नाझनीन अन्सारी आणि डॉ.नजमा परवीन या दोन मुस्लीम महिलांवर सोपविण्यात आली आहे.अयोध्येतील पीठाधीश्वर महंत शंभ देवाचार्य हे या महिलांना रामज्योती देणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top