मूर्तीकारांना मोफत शाडू माती! पालिकेने २२ लाख खर्च केले

मुंबई – पीओपीच्या गणेशमूर्ती पर्यावरणास हानिकारक असून त्यामुळे समुद्र जीव धोक्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घालण्याचे आदेश राज्य सरकार व मुंबई महापालिकेला दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने गणेश मूर्तिकारांना शाडूच्या मातीचा मोफत पुरवठा केला.५०० टन शाडूची माती खरेदी व मूर्तिकारांपर्यत पोहोचवण्यासाठी मुंबई महापालिकेने २२ लाख २४ हजार १३३ रुपये ५५ पैसे खर्च केले आहेत.या खर्चाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, घरोघरी प्रतिष्ठापना करणाऱ्या बाप्पाची मूर्ती शाडूची असावी,असे आवाहन मुंबई महापालिकेने गणेश मूर्तिकारांना केले होते.तसेच पालिकेने त्यासाठी शाडूची माती मोफत उपलब्ध केली तसेच मूर्ती साकारण्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली.शाडूच्या माती मिळविण्यासाठी पालिकेने निविदाही मागवल्या होत्या. अखेर गुजरात येथून शाडूची माती उपलब्ध झाली आणि ५०० टन शाडूची माती मुंबईत आणण्यात आली. त्यानंतर शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकारांना मोफत पुरवठा करण्यात आला.यासाठी पालिकेने २२ लाख २४ हजार १३३ रुपये ५५ पैसे खर्च केले असून याला आता प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top