मृतदेह शोधण्यासाठी इस्रायलकडून प्रशिक्षित गरुड पक्ष्यांचा वापर

तेल अविव – हमासने गेल्या महिन्यात इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात हजारो नागरिक मृत्युमुखी पडले होते.त्यातील काही जणांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. त्यांचा शोध सुरूच आहे.आता या शोध मोहिमेसाठी प्रशिक्षित गरुड पक्ष्यांचा वापर केला जात आहे.यासाठी इस्रायली लष्कर पर्यावरण शात्रज्ञांकडून जीपीएस ट्रॅकिंग तंत्रज्ञानाची मदत घेत आहे.
हॅटझोफे जीपीएस ट्रॅकिंग तंत्रज्ञान उपकरणांद्वारे गरुड पक्षी कुठे थांबतात यांचा मागोवा घेतला जात आहे. कारण मृतदेह हे गरुडांचे खाद्य आहे.ते कितीही उंच आकाशात उडत असले तरी त्यांची तीक्ष्ण नजर जमिनीवर पडलेल्या मृतदेहांकडे असते.आतापर्यंत या गरुडांमुळे चार मृतदेह लष्कराच्या हाती लागले आहेत.इस्रायलच्या पर्यावरण शात्रज्ञांनी आपल्या देशात जन्मलेल्या एका पांढर्‍या रंगाच्या शेपटीच्या गरुडाच्या माहितीचे विश्लेषण केले. तो पक्षी मॉस्कोच्या उत्तरेकडील भागात फिरत होता. हॅटझोफे उपकरणाने त्याच्या हालचालींचा आढावा घेतला आणि तो जिथे जिथे थांबला होता, त्या ठिकाणी शोध घेतला असता तिथे चार मृतदेह सापडले. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर इस्रायल लष्कर आणखी मृतदेह शोधण्यासाठी करत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top