मॅकडोनाल्ड विरोधात गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करावी

  • वैद्यकीय शिक्षण विभागाची मागणी

मुंबई

मुंबईतील मॅकडोनाल्डमध्ये पनीरऐवजी चीज ॲनालॉगचा वापर करण्यात येत असल्याचे आढळल्यानंतर मुंबईतील मॅकडोनाल्डच्या १३ उपहारगृहांसह फास्टफूडची विक्री करणाऱ्या अन्य नामांकित १७ उपहारगृहांना अन्न व औषध प्रशासनाने नोटीस पाठविली. मॅकडोनाल्डच्या अशा वागण्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून उपहारगृहांची साखळी असलेल्या कंपन्यांविरोधात फौजदारी कारवाई करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ऑल फूड ॲण्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनने केली आहे.

मागणीबाबत ऑल फूड ॲण्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनने वैद्यकीय शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आणि मुंबई पोलिसांना पत्र पाठवले आहे. पत्रात म्हटले आहे की, अन्नामध्ये भेसळ करणे, ग्राहकांची फसवणूक करणे व विश्वासार्हतेचे उल्लंघन करणे हा भारतीय दंड संहिता कलम २७२, २७३, ३४, ४२० आणि ४०६ नुसार गुन्हा आहे. त्यामुळे मॅकडोनाल्डविरोधात फौजदारी कारवाई करून गुन्हा दाखल करावा. मॅकडोनाल्डच्या सर्व उपहारगृहांची सखाेल तपासणी करण्यात यावी. मॅकडोनाल्डमध्ये ग्राहकांची फसवणूक होत असल्याने त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करून गुन्हा दाखल करावा.

मॅकडोनाल्डमध्ये पनीरऐवजी चीज ॲनालॉगचा वापर करून ग्राहकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार आढळला. या प्रकरणाची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने मुंबईसह राज्यातील मॅकडोनाल्डच्या उपहारगृहांची तपासणी करण्याक आली. या तपासणीनंतर मुंबईतील १३ उपहारगृहांमध्ये सुधारणा करण्याची नोटीस बजावली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top