मेक्सिकोत श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा अमेरिकन पंडिताच्या हस्ते पूजा

मेक्सिको

मेक्सिकोतील क्वेरेटारो शहरात नव्याने बांधलेल्या प्रभू रामांच्या मंदिरात काल प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी अमेरिकेतून पंडितांनी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर अभिषेक केला. यावेळी भारतीय वंशाच्या नागरिकांसह मेक्सिकन नागरिक या मंदिरात उपस्थित होते. आता हे मंदिर सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले.

मेक्सिकोमधील भारतीय दूतावासाने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मेक्सिकोमध्ये भगवान रामाचे पहिले मंदिर बांधण्यात आले आहे. काल मेक्सिकोच्या क्वेरेटारो शहरात श्री राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. भगवान हनुमानाचे पहिले मंदिरदेखील मेक्सिकोच्या क्वेरेटारो शहरात बांधण्यात आले आहे. नव्याने बांधलेल्या मंदिरातील प्रतिष्ठित मूर्ती भारतातून आणल्या आहेत. भजन आणि आरतीमुळे मंदिरातील वातावरण दैवी उर्जेने भारून गेले होते. यावेळी नागरिक जय श्री रामच्या घोषणा देत होते. या मंदिरात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. पूजा-आरती केल्यानंतर रामनामाचा जप करण्यात आला.” मेक्सिकोतील भारतीय दूतावासाने या सोहळ्याचे काही खास फोटोही एक्सवर शेअर केले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top