मेक्सिको सिटी भूकंपाने हादरली

मेक्सिको सिटी

मेक्सिको सिटीत गुरुवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 इतकी मोजली गेली. या भूकंपामुळे मेक्सिको सिटीतील इमारतीला हादरे बसले. नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. नागरिक मोठ्या संख्येने इमारतीमधून बाहेर पडले आणि मोकळ्या जागेवर, रस्त्यावर येऊन उभे राहिले. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने तात्काळ अलार्म देखील बाजवला. या भूकंपात कोणत्याही प्रकारची जीवितहानी आणि आर्थिक नुकसान झालेले नाही. या भूकंपाचे केंद्र मेक्सिको सिटीच्या दक्षिणेस 200 किलोमीटर अंतरावर होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top