मेट्रो मार्गिकेच्या खोदकामावेळी बाणेरमध्ये हातबॉम्ब सापडले

पुणे
शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे खोदकाम सुरू असताना बाणेर परिसरात जुने हातबॉम्ब सापडल्याची घटना आज दुपारी बारा वाजता घडली. बॉम्ब शोधक-नाशक पथकाने हे हातबॉम्ब निकामी केल्याने पुणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.
हिंजवडी मेट्रो मार्गिकेवर खांब उभे करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. बाणेर परिसरात खोदकाम सुरू असताना दुपारी जुने हातबॉम्ब सापडले. त्यानंतर चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्वरित बॉम्ब शोधक नाशक पथकाला कळवले. या पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बॉम्ब सुरक्षितठिकाणी हलविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. बॉम्ब जिवंत आहे का नाही, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी यंत्राचा वापर केला. त्यानंतर हातबॉम्ब सुरक्षितस्थळी नेऊन निकामी करण्यात आले. हात,बॉम्ब ब्रिटीशकालीन असल्याची शक्यता वर्तवण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top