मेट्रो वन’ ची ४६१ कोटींची थकबाकी !पालिकेची नोटीस

मुंबई – मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने महापालिकेचा २०२२-२३ या आर्थिक वर्षात तब्बल ४६१ कोटी १७ लाख ६१५ रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. सतत पाठपुरावा करूनही हा कर न भरल्याने आता पालिकेने या कंपनीला २१ दिवसांत हा कर भरण्यास सांगितले आहे.

वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान मेट्रो रेल्वे सेवा देणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडे मुंबईतील चार विभागांमधील एकूण २८ मालमत्तांचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा कर थकित आहे. त्यापैकी के -पश्चिम विभागातील एकूण १८ मालमत्तांसाठी ३११ कोटी ७७ लाख ८५ हजार ६६८ रुपये; के-पूर्व विभागातील ६ मालमत्तांसाठी ११६ कोटी २९ लाख १ हजार ५१ रुपये, एल विभागातील २ मालमत्तांसाठी १९ कोटी ४ लाख ६२९ रुपये आणि एन. विभागातील २ मालमत्तांसाठी १४ कोटी ६ लाख १३ हजार २६७ रुपये इतका कर थकित आहे. वर्षभर सतत पाठपुरावा करूनही हा कर भरलेला नाही.दरम्यान के-पश्चिम आणि एल विभागातील मालमत्तांसंदर्भात मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडला मुंबई महापालिकेच्या वतीने नोटीस जारी करत २१ दिवसांच्या आत मालमत्ता करभरणा करण्यास सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top