मोझांबिकमध्ये बोट बुडाली ९१ जणांचा मृत्यू! ५ सुखरूप

मापुटो :

पूर्व आफ्रिकन देश मोझांबिक नामपुला राज्यात काल रात्री उशिरा एक मासेमारी बोट बुडाली. या अपघातात ९१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

नामपुला राज्य सचिव जैमे नेटो यांनी सांगितले की, बोटीत १३० प्रवासी प्रवास करत होते. जे बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त होते. ही बोट मोझांबिकच्या नामपुला प्रांतातील लुंगा शहरातून मोझांबिकच्या मुख्य बेटावर जात होती. ही बोट मासेमारीसाठी वापरली जात असल्याने ती प्रवाशांना घेऊन जाण्या योग्यतेची नव्हती.
घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. आतापर्यंत ५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ९१ जणांचा मृत्यू झाला असून यात लहान मुलाची संस्था जास्त आहे. या घटनेशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top