मोठागाव माणकोली पूल ३ दिवस वाहतुकीसाठी बंद

डोंबिवली :

डोंबिवलीतील मोठागाव येथील माणकोली उड्डाण पूल पुलाच्या वजन भार तपासणीच्या कामासाठी आजपासून २ मे पर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, असे फलक मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाने (एमएमआरडीए) डोंबिवलीतील रस्त्यांवर लावले आहेत. परिणामी लोकांना २ मे पर्यंत कल्याण शीळ रोड मार्गे आपला प्रवास करावा लागणार आहे.

कल्याण शीळ मार्गावरील लांबचा वळसा व वाहन कोंडीच्या समस्येला त्रासलेल्या नागरिकांनी माणकोली पुलाच्या उदघाटनांची प्रतीक्षा न करता पुलावरून वाहतूक सुरू केली. ही बाब लक्षात येताच एमएमआरडीए प्रशासनाने पूल बंद केला. मात्र प्रवाशांनी पुलावरील एक मार्गिका खुली करत येथून रोजचा प्रवास सुरू केला. पुलाचे लोड टेस्टिंगचे काम शिल्लक असल्याने पूल वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. मात्र आता २९ एप्रिल ते २ मे या कालावधीत एमएमआरडीएकडून या पुलाचे लोड टेस्टिंग करण्यात येणार आहे. यामुळे २ मे पर्यंत पूल पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top