मोदींची मुंबईत १५ मे रोजी सभा ! १७ मेला रोड शो

मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ मे रोजी मुंबईत येणार आहेत. मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी १५ मे रोजी मुंबईत सभा घेणार आहेत. त्यानंतर १७ मे रोजी मुंबईत पंतप्रधानांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १२ मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची देखील मुंबईत सभा होणार आहे. मुंबईतील ६ जागा जिंकण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा मुंबईत प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळातील मोदींची ही मुंबईतील पहिली जाहीर सभा आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा यांच्या सभेचे ठिकाण अद्याप निश्चित झाले नाही. पंतप्रधान आणि अमित शहा यांच्या सभांमुळे महायुतीच्या उमेदवारांना फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे नेते सभा घेत आहेत. अशातच आता पंतप्रधान मोदी देखील महायुतीच्या उमेदवारांसाठी मुंबईत सभा घेणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top