Home / News / मोपा विमानतळावर निळ्यारंगाच्या टॅक्सीवर अचानक बंदी

मोपा विमानतळावर निळ्यारंगाच्या टॅक्सीवर अचानक बंदी

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील पेडणे तालुक्यातील टॅक्सी चालकांसाठी मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर खास सुरू करण्यात आलेली निळ्या रंगाची ‘ब्लू...

By: E-Paper Navakal

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील पेडणे तालुक्यातील टॅक्सी चालकांसाठी मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर खास सुरू करण्यात आलेली निळ्या रंगाची ‘ब्लू कॅब’ प्रीपेड टॅक्सी सेवा काल मंगळवारपासून अचानक बंद करण्यात आली आहे. विमानतळ प्रशासनाने सुरक्षा मंजुरी न घेतल्याचे कारण देत ही कारवाई केली असल्याने स्थानिक टॅक्सी चालकांमध्ये नाराजी पसरली आहे.

जीएमआर एअरपोर्ट्स लिमिटेडने ब्लू कॅब प्रीपेड टॅक्सी असोसिएशनला पाठवलेल्या पत्रानुसार, परवाना करारातील नियमांनुसार असोसिएशनला गृह मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोची सुरक्षा मंजुरी घेणे आवश्यक होते. वारंवार याबद्दल माहिती देऊन देखील ही मंजुरी सादर न केल्याने परवाना कराराचे उल्लंघन झाले असल्याचे नमूद करत जीएएलने तातडीने सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.यापूर्वीही जून २०२४ आणि जानेवारी २०२५ मध्ये यासंदर्भात नोटिसा पाठवल्याचा दावा जीएएलने केला आहे. ब्लू कॅब प्रीपेड टॅक्सी असोसिएशनने नोटीस मिळाल्याची माहिती देत याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.

Web Title:
संबंधित बातम्या