म्हापशाचा राखणदार देव बोडगेश्वराचा आज जत्रोत्सव

पणजी- यंदा म्हापसा येथील ग्रामस्थांचा राखणदार देव बोडगेश्वराचा जत्रोत्सव उद्या बुधवार २४ जानेवारी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.हा जत्रोत्सव पुढील १३ दिवस चालणार आहे. दरम्यान,देव बोडगेश्वराचा ३१ वा वर्धापनदिन आज मंगळवारी पार पडला.

आज देव बोडगेश्वराच्या मूर्ती प्रतिष्ठानपणेचा वर्धापनदिन सोहळा पार पडला.उद्यापासून ४ फेब्रुवारीपर्यंत भजन, दशावतारी नाटके, भक्तिगीते,महापूजा, सांस्कृतिक कार्यक्रम, भरतनाट्य आणि भाविकांसाठी दररोज महाप्रसाद वाटप केले जाणार आहे.म्हापशाची ग्रामदेवता शांतादुर्गा देवीच्या आदेशाचा पाईक म्हणून देव बोडगेश्वराकडे पाहिले जाते.म्हापसा येथील रहिवाशांचे तसेच इतर भाविकांचे कल्याण करावे,असा देवीचा आदेश आहे.हा आदेश देव बोडगेश्वर
प्रामाणिकपणे पार पाडत असतो.त्यामुळे या देवाचे महात्म्य वाढत चालले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top