यंदा कराडच्या कृषी प्रदर्शनात २ टनाचा रेडा आकर्षण ठरणार!

मुंबई- महाराष्ट्र राज्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड शहरात २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान पशुपक्षी प्रदर्शन आयोजित केले आहे.
यंदाच्या या प्रदर्शनात बेळगावचा २ टनाचा ‘गजेंद्र’ नावाचा रेडा सर्वांचेच आकर्षण आणि कुतूहलाचा विषय ठरणार आहे.

या प्रदर्शनात ‘गजेंद्र’ला बघण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली असून गजेंद्रची सर्वानाच उत्सुकता लागून राहिली आहे.बेळगांवचे रहिवाशी असलेले ज्ञानदेव नाईक यांचा हा रेडा असून त्याचे वजन २ टन आहे. हत्तीसारखे वजन असल्याने या रेड्याचे नांव गजेंद्र ठेवले आहे.अनेक प्रदर्शनात हा रेडा सर्वाचा कुतूहल व आकर्षणाचा विषय राहिला आहे.या रेड्याचा दिवसाचा खर्च २५०० ते ३००० हजार रुपयाच्या घरात आहे.त्याला दररोज ५ किलो सफरचंद, गव्हाचा आटा आणि काजूचा खुराक दिला जातो. या गजेंद्रने महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक प्रदर्शने गाजवली आहेत.एका प्रदर्शनात या रेड्याला दीड कोटी रुपयांची मागणी आली होती. हा रेडा कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात दाखल होणार आहे.या प्रदर्शनात अनेक पशु पक्षी सहभागी होणार आहेत.या रेड्याला बघण्यासाठी स्वंतत्र व्यवस्था केली असून गजेंद्रची सर्वानाच उत्सुकता लागून राहिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top