यवतमाळमध्ये मृतावस्थेतआढळला वाघाचा बछडा

यवतमाळ -जिल्ह्यातील वणी तालुक्‍यातील सुकनेगाव शिवारात असलेल्‍या तलावाजवळ वाघाचा बछडा मृतावस्‍थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
कोळसा खाणी तसेच जंगल परिसरात वाघाचा वावर असल्‍याचे या घटनेवरून यापुर्वी स्‍पष्‍ट झाले आहे.

सुकनेगाव येथील तलावाजवळ आईपासुन दुरावलेला वाघाचा बछडा जमिनीवर पडलेला लोकांना दिसला.त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यानंतर तो मृतावस्थेत असल्याचे समजले.त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला दिली. वन‍परीक्षेत्रीय अधिकारी प्रभाकर सोनडवले यांनी पथकासह तातडीने घटनास्‍थळ गाठले.त्‍यावेळी सुकनेगाव बिटमध्‍ये महसुल विभागाच्‍या कक्ष क्रमांक ६ पासुन २० ते ३० मीटर अंतरावरील तलावाजवळ हा वाघाचा बछडा मृतावस्‍थेत पडलेला आढळला.

या परिसरात मागील काही दिवसांपासुन एका वाघिनीचा संचार असल्याचे सांगण्‍यात येत आहे.त्‍या वाघीनीपासून तिचा बछडा विभक्‍त झाला असावा. त्यानंतर त्‍याचा भुकेने मृत्‍यू झाला असावा,असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. मंदर येथील निलगीरी वनात वाघाच्‍या या मृत बछड्यावर अत्‍यंसंस्‍कार करण्‍यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top