Home / News / युक्रेनचे परराष्ट्र मंत्री कुलेबा यांचा राजिनामा

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री कुलेबा यांचा राजिनामा

किव्ह – युक्रेनवरील रशियाच्या वाढत्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांवर नाराज आहेत.काही मंत्र्यांची उचलबांगडी होण्याची चर्चा आहे....

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

किव्ह – युक्रेनवरील रशियाच्या वाढत्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांवर नाराज आहेत.काही मंत्र्यांची उचलबांगडी होण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.युक्रेनवर रशियाने केलेल्या ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यांत सात नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये संताप व्यक्त होत आहे. झेलेन्स्की या महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी कुलेबा यांनी परराष्ट्र मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने झेलेन्स्कींना धक्का बसला आहे. कुलेबा हे झेलेन्स्की यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते.त्यांच्याआधी संरक्षण खात्याशी संबंधित उद्योग खात्याचे मंत्री अलेक्झांडर कामिशीन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

Web Title:
संबंधित बातम्या