युद्धानंतर इस्रायल गाझामध्ये बफर झोन तयार करणार

तेल अवीव – आठवडाभराच्या युद्ध विरामानंतर इस्रायलने गाझा पट्टीमध्ये पुन्हा युद्धाला तोंड फोडले आहे.इस्रायल हमासविरुद्धचे युद्ध संपल्यानंतर गाझा पट्टीमध्ये बफर झोन तयार करायचा विचार करत आहे.बफर झोन तयार करून इस्रायलला गाझामधून होणारी सर्व प्रकारची घुसखोरी कायमची थांबवायची आहे.विशेष म्हणजे, इस्रायलने ही योजना अमेरिका आणि अरब देशांशीही शेअर केली आहे.’रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेच्या वृत्तात हा दावा करण्यात आला आहे.

बफर झोनच्या माध्यमातून हमासला एका विशिष्ट भागात बंदिस्त करून तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याचा इस्रायलचा प्रयत्न असेल. गाझा पट्टी फक्त ४० किलोमीटर लांब आणि सुमारे १२ किलोमीटर रुंद आहे आणि तिची लोकसंख्या अंदाजे २३ लाख आहे.इस्रायलने येथे बफर झोन तयार केल्यास हा भूप्रदेश अधिक अरुंद होईल. गाझा सीमेवरून पॅलेस्टिनी अनेकदा इस्रायलमध्ये घुसखोरी करतात. त्यांच्याकडे उपचार करण्यासाठी प्रवेशाची परवानगी असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top