युरोपचे वैज्ञानिक अवकाशात कृत्रिम सूर्यग्रहण घडवणार

पॅरिस –

युरोपियन स्पेस एजन्सीची (ईएसए) ‘प्रोबा-३’ ही मोहीम सप्टेंबरमध्ये भारताच्या पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने प्रक्षेपित केली जाणार आहे. या अनोख्या मोहिमेत दोन छोटे सॅटेलाईट, एक ३४० किलोग्रॅमचा कोरोनाग्राफ आणि दुसरा २०० किलोग्रॅमचा ऑकुल्टर समाविष्ट आहे. हे सुमारे १५० मीटरच्या अंतरात उड्डाण करतील. ऑकुल्टरचे सूर्याच्या प्रकाशाला रोखेल, त्यामुळे कोरोनाग्राफ एकाच वेळी अनेक तासांसाठी धूसर होऊन सूर्याच्या कोरोना (कडा)ची प्रतिमा देण्याची संधी मिळेल. म्हणजेच ही एक प्रकारे स्थिती कृत्रिम सूर्यग्रहणासारखी असेल.

याबाबत स्पेस एजन्सीने म्हटले आहे की, ही मोहीम एक कृत्रिम सूर्यग्रहण घडण्यासाठी दोन उपग्रहांमधून उड्डाण करेल. यामुळे सूर्याच्या धूसर कोरोनाची नवी दृश्ये दिसतील. कृत्रिम सूर्यग्रहणाशिवाय या मोहिमेचा उद्देश सौर कोरोना आणि सौर वाऱ्यांच्या गतिशीलतेचा अभ्यास करणे हा आहे. अर्थात, त्याचा पृथ्वीवर कोणताही परिणाम दिसणार नाही. ‘प्रोबा-३’ या मिशनमध्ये दोन सुधारित छोटे सॅटेलाईट असतील. त्यांना अंतराळातील एका वेगळ्या स्थितीसाठी तयार करण्यात आले आहे. एक सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी कोरोनाग्राफच्या रूपात कार्य करेल, तर दुसरा एक ऑकुल्टरच्या रूपात कार्य करेल, जो सूर्याच्या प्रखर प्रकाशाला रोखतो. दोन सॅटेलाईटचे अलायमेंट १५० मीटर अंतरावर काही मिलिमीटरच्या सीमेत असेल. या मोहिमेचे यश भविष्यातील खगोल दुर्बिणी आणि इंधन भरण्याच्या मोहिमांसाठीही महत्त्वाचे ठरेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top