युरोपात हिमवृष्टीमुळे थंडीचा कडाका पश्चिमेला पूर!वीजपुरवठा खंडित

कोपनहेगन – युरोपमध्ये काल गुरुवारी वादळी वारे आणि हिमवृष्टीमुळे थंडीने कहर माजवला.तीव्र थंडी आणि हिमवादळामुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि स्कॅन्डिनेव्हियामधील शाळा बंद पडल्या,तर पश्चिम युरोपमध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे पूर आला.स्वीडनमधील नॉर्डिक प्रदेशात काल गुरुवारी तापमानाचा पारा उणे ४२ अंशावर घसरला होता.

जर्मनी,फ्रान्स आणि नेदरलॅंडमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.गेल्या दोन आठवड्यात हा दुसरा पूर आहे.फ्रान्समध्ये एका मृत्यूची नोंद झाली आहे. स्वीडिश लॅपलँडमध्ये पारा उणे ४३.६ सेल्सिअसपर्यंत घसरला असून स्वीडनमध्ये २५ वर्षांतील जानेवारी महिन्यातील सर्वात कमी तापमान नोंदले गेले.

नॉर्वे आणि स्वीडनच्या सीमेजवळ देशातील सर्वांत कमी उणे ४२.५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. गेल्या दोन आठवड्यापासून जर्मनीत मुसळधार पाऊस कोसळत आहे.देशात ऑरेंज वेदर अलर्ट जारी केला आहे. यूकेमध्ये पूर येऊन वीजपुरवठा खंडित झाला आहे. ब्रिटन,आयर्लंड आणि नेदरलँड्सच्या अधिकृत हवामान विभागाने हेन्क असे नाव दिलेल्या या वादळामुळे संपूर्ण यूकेमध्ये वीज खंडित करावा लागला आहे.संपूर्ण पश्चिम युरोप महापुराशी लढा देत आहे, बचाव कार्य सुरू आहे.सायबेरिया आणि आर्क्टिक प्रदेशातील थंड हवेची लाट पश्चिम रशियावरही पसरली आहे असून मॉस्को आणि इतर भागातील तापमान उणे ३० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top