येल विद्यापीठात पत्रकारावर हल्ला

कनेक्टिकट
येले विद्यापीठात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे वृतांकन करायला गेलेल्या महिला पत्रकारावर हल्ला करण्यात आला. यावेळी तिचा विनयभंग करण्यात आला असून तिच्या डोळ्यात पॅलेस्टाईनचा झेंड्याच्या काठीचे घुसवण्यात आला आहे.
सहार टार्टक असे या महिला पत्रकाराचे नाव असून ती येल फ्री प्रेस या विभागाची प्रमुख संपादक आहे. येल विद्यापीठात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे वृतांकन करायला ती विद्यापीठात गेली असता हा प्रकार घडला. या घटनेनंतर तिला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. येल विद्यापीठात अशा प्रकारच्या हिंसेला स्थान दिले जाणार नाही व पोलिस या प्रकरणाची चौकशी करतील अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. येल विद्यापीठीतील विद्यार्थी गेल्या सहा दिवसांपासून पॅलेस्टाईनवर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. या आधी त्यांनी तिथे सहा दिवस उपोषणही केले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top