योगशिबिरासाठी कर भरावाच लागणार बाबा रामदेवांना सुप्रीम कोर्टाचा दणका

नवी दिल्ली
योगगुरू बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाने आणखी एक झटका दिला. बाबा रामदेवांच्या योग शिबिरांचे आयोजन करणाऱ्या पतंजली योगपीठ ट्रस्टविरोधातील सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला. त्यामुळे पतंजली योगपीठ ट्रस्टला आता साडेचार कोटींचा सेवा कर भरावा लागणार आहे.
पतंजली योगपीठ ट्रस्ट रामदेव यांच्या योग शिबिरांसाठी प्रवेश शुल्क आकारते. त्यामुळे सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाने आपल्या निर्णयात पतंजली योगपीठ ट्रस्टला निवासी आणि अनिवासी अशा दोन्ही प्रकारच्या योग शिबिरांचे आयोजन करण्यासाठी सेवा कर भरणे बंधनकारक असल्याचे म्हटले होते. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अभय एम ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने म्हटले की, ‘सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाने निर्णय योग्यच आहे. प्रवेश शुल्क आकारल्यानंतर शिबिरांमध्ये योग ही सेवा ठरते. न्यायाधिकरणाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही. त्यामुळे पतंजली योगपीठ ट्रस्टचे अपील फेटाळण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top