Home / News / रक्षाबंधनाचा संबंध मुघलांशी! वक्तव्यावरून सुधा मूर्ती ट्रोल

रक्षाबंधनाचा संबंध मुघलांशी! वक्तव्यावरून सुधा मूर्ती ट्रोल

नवी दिल्ली -राज्यसभेच्या खासदार, लेखिका सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधन सणाचा संदर्भ मुघल सम्राटाशी जोडल्याने वाद निर्माण झाला आहे. एका व्हिडिओत...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली -राज्यसभेच्या खासदार, लेखिका सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधन सणाचा संदर्भ मुघल सम्राटाशी जोडल्याने वाद निर्माण झाला आहे. एका व्हिडिओत सुधा मूर्ती यांनी म्हटले आहे की, राणी कर्णावती अडचणीत असताना तिने मुघल साम्राज्याचा राजा हुमायूला एक धागा पाठवला.

अडचणीत असलेल्या बहिणीचे संरक्षण करा, असा संदेश दिने पाठवला होता. हुमायूनला हा धागा नेमका कशासाठी आहे, हे कळले नाही. त्याला स्थानिकांनी सांगितले की, बहिणीने भावाला मदतीसाठी बोलावण्याचे हे संकेत आहेत. हुमायूला राणी कर्णावतीला वाचवणे आपले कर्तव्य असल्याची जाणीव झाली आणि तो निघाला. मात्र, त्याला पोहचण्यास विलंब झाला. तो पोहचेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता, तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आणि आताही ही पंरपरा देशभरात पाळली जाते. म्हणून बहीण कितीही अंतरावरून भावाला राखी बांधायला जाते. यावरून सोशल मिडीयावर सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधनाचा सणाचा संबंध मुघल साम्राज्याशी जोडला आहे, असा आरोप करत टीका होत आहे.

Web Title:
संबंधित बातम्या