रत्नागिरीच्या शीळ धरणात केवळ २५ टक्के पाणीसाठा

रत्नागिरी

रत्नागिरी शहराला शीळ धरणाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र आता या धरणामध्ये केवळ २५ टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. हा पाणीसाठा १५ जूनपर्यंत पुरेल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे शहरात भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कधीही दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

रत्नागिरीला शीळ, पानवल धरण आणि नाचणे येथील तलावामधून पाणीपुरवठा केला जातो. पानवल धरणाला गळती असल्याने ते बंद ठेवण्यात आले आहे. नाचणेतील तलाव आटले आहे. त्यामुळे शहराला केवळ शीळ धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र आता या धरणामध्ये सुध्दा केवळ २५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, यावर्षी एलनिनोमुळे परतीचा पाऊस झाला नाही. हा पाऊस झाला तर शीळ धरण २० ते २५ दिवस भरून वाहते. शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता ३.७७६ दशलक्ष घनमीटर आहे. परंतु यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणामध्ये ०.८१९ दशलक्ष घनमीटर एवढा साठा आहे. हे पाणी १५ जूनपर्यंत पुरेल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top