रदीपसिंह हत्या प्रकरणात कॅनडात ३ भारतीयांना अटक

ओटावा – खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडा पोलिसांनी तीन भारतीय नागरिकांना अटक केली आहे.कॅनडा पोलिसांना असा संशय आहे की,अटक केलेल्या लोकांना भारत सरकारने गेल्या वर्षी निज्जरला मारण्याची सुपारी दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार,तपासकर्त्यांनी काही महिन्यांपूर्वी कॅनडातील संशयितांची ओळख पटवली होती. तेव्हापासून कॅनडा पोलीस त्यांच्यावर कडक पाळत ठेवून होते.अखेर शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली.आता पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.जून २०२३ मध्ये कॅनडातील व्हँकोव्हरमधील एका पार्किंग स्लॉटमध्ये हरदीप सिंग निज्जरची हत्या केली होती.दोन अज्ञात हल्लेखोरानी निज्जर याच्यावर एकापाठोपाठ एक गोळ्या झाडल्या होत्या.ही घटना खलिस्तानी दहशतवाद्यांना कॅनडात आश्रय मिळण्याच्या मुद्द्याला पुन्हा हवा देणारी ठरली.तर हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमागे भारतीय एजंटचा हात आहे, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. त्यांच्या आरोपांनंतर भारत सरकारने कॅनडाच्या उच्चाधिकाऱ्यांची भारतातून हकालपट्टी केली. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधात वितृष्ट आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top