रशियन नौदल बळकट होणार! दोन आण्विक पाणबुड्या दाखल

मॉस्को- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी यूक्रेनशी युद्ध सुरू असताना आपले नौदल बळकट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.रशियाने आपल्या नौदलात दोन आण्विक पाणबुडीचा समावेश केला आहे.या पाणबुड्यांवरील क्षेपणास्त्रांची मारक क्षमता ८ ते १० हजार किलोमीटर इतकी आहे.

राष्ट्रपती पुतिन यांनी इम्पिरेटर अलेक्झांडर-३ आणि क्रॅस्नोयार्स्क नावाच्या या दोन पाणबुड्यावर राष्ट्रध्वज उभारून त्यांचे उद्घाटन केले.हा उद्घाटन समारंभ सेवेरोडविंस्क शहराच्या सेवमास शिपबिल्डिंग यार्डमध्ये झाले. या पाणबुड्या रशियन-प्रशांत दलात सामील होतील. हा विभाग प्रशांत महासागरापासून हिंद महासागरापर्यंत रशिय नौदलाचे अस्तित्व दाखवितो.या अणु पाणबुड्या अणुशक्तीने सज्ज असून त्यांना पुढील १० वर्षे इंधनाची गरज लागणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top