रशियन लष्कराचा युक्रेनवर प्रतिहल्ला कीव-खार्किववर क्षेपणास्त्रे डागली

कीव
युक्रेन लष्कराने रशियातील बेलगोरेड शहरावर शनिवारी क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर काल रशियन लष्कराने प्रतिहल्ला करत युक्रेनच्या राजधानी कीव आणि खार्किव या दोन मोठ्या शहरांवर 100 क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला, तर 130 हून अधिक लोक जखमी झाले.
रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षे पूर्ण होत असून रशियन लष्कराने पुन्हा युक्रेनच्या शहरी भागांवर क्षेपणास्त्र हल्ले तीव्र केले आहेत. युक्रेनच्या लष्कर प्रमुखांनी सांगितले की, रशियाच्या हवाई दलाने 100 क्षेपणास्त्रे डागली. त्यातील 10 रशियन क्षेपणास्त्रे आम्ही पाडली. इतर क्षेपणास्त्रे कीव आणि खार्किवमध्ये पडली. त्यामुळे कीवसह आसपासच्या परिसरात चार जणांचा मृत्यू आणि 70 जण जखमी झाले, तर खार्किवमध्ये एक जण ठार आणि 60 जण जखमी झाले. या हल्ल्यात आतापर्यंत रशियने एवढ्या मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे डागण्याची पहिलीच वेळ आहे. दरम्यान, रशियातील बेलगोरेड शहरावर शनिवारी युक्रेन लष्कराने क्षेपणास्त्रे डागली होती. या हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाला, तर 111 जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन मुलांचाही समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top