रशियाची नवी ‘सरमत’ यंत्रणा अंतराळातील उपग्रह पाडणार

मॉस्को – रशियाने हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांना रोखण्यासाठी खास ‘एस-५००’ यंत्रणा तयार केली आहे.या यंत्रणेचे नाव ‘सरमत’ असे ठेवण्यात आले आहे.ही यंत्रणा यावर्षीच तैनात केली जाणार आहे. अंतराळातील उपग्रहही पाडण्याची क्षमता या यंत्रणेत आहे.

रशियन सैन्यदलाची क्षमता वाढवण्यासाठी हे क्षेपणास्त्र तैनात केले जाणारआहे. हे क्षेपणास्त्र २०० टनाहून अधिक वजनाचे असून त्यात अनेक शस्त्रास्त्रे घेऊन जाण्याची क्षमता आहे. रशियाचे संरक्षण उपमंत्री ॲॅलेक्सी क्रिवोरुचको यांनी सांगितले की,ही आंतरखंडीय क्षेपणास्त्र यंत्रणा असून ती दुसऱ्या संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणांना निकामी करण्यासाठी तयार केली आहे.त्याचबरोबर ‘टीयू-१६०एम’ हे क्षेपणास्त्र यंत्रणा वाहनही तयार केले जाणार आहेत.

‘एस-५००’ ही जगातील सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. ती हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांना नष्ट करू शकते. ही यंत्रणा ‘क्रूझ’ व ‘बॅलेस्टिक’ क्षेपणास्त्र,उपग्रह,पाचव्या पिढीच्या स्टेल्थ विमानांना पाडू शकते.रशियाने यापूर्वी ‘एस-३००’ व ‘एस-४००’ ही क्षेपणास्त्रविरोधी तैनात केली आहे. ‘एस-३००’ ही यंत्रणा १५० किमी, तर ‘एस-४००’ यंत्रणा ४०० किमी मारा करते, तर ‘एस-५००’ ही यंत्रणा ६०० किमीपर्यंत मारा करू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top