रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यात हॅरी पॉटरचा ‘किल्ला’ उद्ध्वस्त

किव- जवळपास दीड वर्षांपासून अद्याप सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धात रशियाने केलेल्या मिसाईल हल्ल्यामध्ये काळ्या समुद्रात असलेल्या युक्रेनच्या ओडेसा शहरातील अनेक मोठ्या इमारतींना उद्ध्वस्त झाल्या असून या हल्ल्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. उद्ध्वस्त झालेल्या इमारतींमध्ये ‘हॅरी पॉटरचा किल्ला’ म्हणून ओळखल्या जाणार्या इमारतीचाही समावेश आहे.
युक्रेनने या हल्ल्याची पुष्टी केली असून रशियाच्या मिसाईल हल्ल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून त्यात लहान मुले आणि गरोदर महिलांचादेखील समावेश आहे. या हल्लयात मिसाईल हल्ल्यामध्ये जवळपास २० इमारतींचे नुकसान झाले आहे. यामध्ये ‘हॅरी पॉटरचा किल्ला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका शैक्षणिक संस्थेचा देखील समावेश आहे.या वास्तूची रचना हॅरी पॉटर चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे असल्याने तिला त्याच नावाने ओळखले जात असे. व्हिडिओ आणि फोटोमध्ये वास्तूचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. रशियाकडून हल्ल्यासाठी घातक मिसाईला वापर करण्यात आला आहे. यावरुन रशियाचा इरादा काय आहे हे दिसून येत अशी टीका पोलीस अधिकारी अॅड्रीये कोस्टिन यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top