रशियात युक्रेनचा ८ ठिकाणी ड्रोन हल्ला! इंधन डेपो खाक

मॉस्को- युक्रेनच्या विशेष सैन्यदलाने शनिवारी रात्री उशिरा रशियाच्या ८ भागांत लांब पल्ल्याच्या ड्रोनने जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात रशियातील तीन वीज उपकेंद्रे आणि इंधन डेपो जळून खाक झाले.

अमेरिकन मीडिया हाऊसने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. या हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. रशियाच्या संरक्षण यंत्रणेने युक्रेनचे सुमारे ५० ड्रोन पाडल्याचे म्हटले आहे. रशियाने युक्रेनवर हल्ले करून तेथील ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे. युक्रेनमध्ये सध्या भयंकर दुष्काळ असून आता तापमानात सातत्याने घसरण होत आहे. किमान तापमान उणे असून याचाच फायदा घेत रशियन सैन्य युक्रेनवर हल्ला करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लष्कराशी संबंधित उद्योगांना ऊर्जा पुरवणारी रशियाची ऊर्जा केंद्रे हल्ल्याचे लक्ष्य होते. युक्रेनच्या सुरक्षा सेवा, संरक्षण गुप्तर विभाग आणि विशेष दलांनी संयुक्तपणे हल्ला केला होता. हा हल्ला युक्रेनच्या सुरक्षा सेवा, संरक्षण गुप्तचर आणि विशेष दलांनी संयुक्तपणे केला होता. युक्रेनच्या हल्ल्यानंतर अनेक भागात वीज आणि पाणीपुरवठा ठप्प झाल्याने येथे भयंकर स्थिती आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top