रशियात शाळकरी मुलीचा गोळीबार ! १ ठार ५ जखमी

मॉस्को :

रशियामधील ब्रायन्‍स्‍क शहरातील एका शाळेत १४ वर्षाच्‍या विद्यार्थिनीने केलेल्‍या गाेळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. या गोळीबारानंतर विद्यार्थिनीने स्वत:चे जीवनही संपवले.

युक्रेनच्या सीमेपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रायन्स्क शहरातील एका शाळेत आठवीत शिकणार्‍या मुलीने वर्गात गोळीबार केला. या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी एका विद्यार्थाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याशिवाय हल्ल्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

यापूर्वी रशियामधील काझान आणि पर्म या शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्‍या गोळीबाराने देश हादरला होता. यानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बंदूक नियंत्रण कायद्यांचे पुनरावलोकन करण्याची मागणी केली. रायफल मिळविण्याचे किमान वय १८ वरून २१ करण्यात आले. रायफल परवाना देण्‍यापूर्वी मानसिक आरोग्य तपासणी कडक करण्यात आली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top