रश्मिका डीपफेक प्रकरणमुख्य आरोपीला अटक

नवी दिल्ली – अभिनेत्री रश्मिका मंदाना डीपफेक प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्सचे पोलीस उपायुक्त हेमंत तिवारी यांनी ही माहिती दिली.

बॅालिवूडमधील अभिनेत्री रश्मिका मंधाना हिचा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला डीपफेक व्हिडिओ गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.याबाबत रश्मिकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणीच्या तपासात दिल्ली पोलिसांनी आज मुख्य आरोपीला अटक केली,असे तिवारी यांनी सांगितले. मात्र या आरोपीचे नाव त्यांनी उघड केले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top