राजधानी दिल्लीत पारा चाळीशी पार

नवी दिल्ली – दिल्लीकर सध्या भीषण गरमीने हैराण झाले आहेत. राजधानीत तापमानाचा पारा काल ४१.१ अंश सेल्सियसवर पोहोचल्याने अंगाची काहिली होत होती.
या वर्षीच्या उन्हाळ्यात रविवारचा दिवस दिल्लीसाठी सर्वाधिक उष्ण ठरला.रविवारी दिल्लीतील कमाल तापमान ४१.१ अंश सेल्सियस नोंदले गेले.हे या वर्षीचे आतापर्यंतचे सर्वात उच्चांकी तापमान आहे. दिल्लीत ८ मे पर्यंत आकाश निरभ्र राहील. त्यामुळे दिल्लीकरांना रणरणत्या उन्हाचे चटके सोसावे लागतील. पारा ४२ अंश सेल्सियसपर्यंत जाईल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top