Home / News / राजस्थानच्या पोलीस दलात महिलांना ३३ टक्के आरक्षण

राजस्थानच्या पोलीस दलात महिलांना ३३ टक्के आरक्षण

जयपूर – राजस्थान पोलीस दलाच्या दुय्यम सेवा विभागात भरतीमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. त्यासंबंधीच्या कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

जयपूर – राजस्थान पोलीस दलाच्या दुय्यम सेवा विभागात भरतीमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. त्यासंबंधीच्या कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

राजस्थानचे कायदा मंत्री जोगाराम पटेल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे राजस्थानच्या पोलीस दलात महिलांचे प्रतिनिधित्व वाढणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे,असे पटेल यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात याबाबतचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता आता केली जात आहे.पोलीस दलातील वाढीव ३३ टक्के आरक्षणाचा लाभ अनुसूचित जाती-जमाती व ओबीसी समाज घटकांतील महिलांना मिळणार आहे,असे पटेल पुढे म्हणाले.

Web Title:
संबंधित बातम्या