Home / News / राजस्थानमध्ये विद्यार्थिनींच्या सायकली पुन्हा भगव्या झाल्या

राजस्थानमध्ये विद्यार्थिनींच्या सायकली पुन्हा भगव्या झाल्या

जयपूर – राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) सरकार सत्तेवर येताच शालेय विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या सायकलींचा रंग पुन्हा एकदा भगवा झाला...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

जयपूर – राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) सरकार सत्तेवर येताच शालेय विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या सायकलींचा रंग पुन्हा एकदा भगवा झाला आहे. विद्यार्थिनींची शाळांमधील गळती रोखण्याच्या उद्देशाने २००८ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने नववीच्या विद्यार्थिनींना मोफत सायकली देण्याचे धोरण लागू केले होते. तेव्हा सायकली काळ्या रंगाच्या होत्या. २०१३ मध्ये भाजपाची सत्ता येताच रंग भगवा झाला. २०१८ मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर येताच सायकली काळ्या झाल्या. आता पुन्हा भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर सायकली भगव्या झाल्या आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या